आपल्या नकळत आपण असे काही पदार्थ खातो जे शरीरासाठीच नव्हे तर केसांसाठीही घातक ठरू शकतात.
पाहूयात कोणकोणते पदार्थ ठरु शकतात केस गळतीचं प्रमुख कारण.
साखरेचं अति सेवन किंवा साखरयुक्त पदार्थांचे जास्त सेवन केल्याने केस कमकुवत होतात आणि गळू लागतात.
जास्त तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे स्कॅल्पवरील नैसर्गिक तेलाचं संतुलन बिघडतं. ज्यामुळे केस गळती वाढते.
रिफाइन्ड कार्बोहायड्रेट्स जसे की मैदा, व्हाइट ब्रेड हे केसांच्या मुळांना कमकुवत करतात आणि केसांची वाढ कमी करतात.
जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. ज्यामुळे केस कोरडे पडतात आणि तुटू लागतात.
अल्कोहोलचे अति सेवन केल्याने स्कॅल्प कोरडा होतो. ज्यामुळे केस वाढीवर परिणाम होतो आणि गळती वाढते.
अतिप्रमाणात डेअरी प्रोडक्ट्स घेण्यामुळे हार्मोनल असंतुलन निर्माण होऊ शकतं. जे केस गळतीचं कारण बनतं.
या पदार्थांपासून दूर राहून, आहारात प्रथिने, लोह, ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स आणि जीवनसत्त्वं युक्त पदार्थांचा समावेश करावा. यामुळे केस मजबूत होतात आणि त्यांची गळती थांबवता येते.