तुरटीचा वापर अनेक घरांमध्ये पाणी शुद्धीकरणासाठी केला जातो. तुरटीमुळे पाणी स्वच्छ आणि पिण्यायोग्य होते.

Intern
Apr 12,2025


तुरटीचा वापर अनेक घरांमध्ये पाणी शुद्धीकरणासाठी केला जातो. तुरटीमुळे पाणी स्वच्छ आणि पिण्यायोग्य होते.


पण तुम्हाला माहितेय का, तुरटीचं पाणी अंघोळीसाठी वापरल्याने आरोग्यास अनेक फायदे होतात? जाणून घेऊयात तुरटीचे फायदे.

1. आराम

तुरटीच्या पाण्याने अंघोळ केल्यास त्वचेला थंडावा मिळून शरीराला आराम मिळतो.

2. थकवा

दिवसभराचा ताण आणि थकवा दूर करण्यासाठी तुरटीच्या पाण्याने अंघोळ करणे उपयोगी ठरते.

3. दुर्गंधी

शरीराची दुर्गंधी दूर करण्यासाठी तुरटीचं पाणी अतिशय प्रभावी आहे.

4. त्वचा

जर तुम्हाला त्वचा मुलायम आणि टवटवीत ठेवायची असेल, तर तुरटीचं पाणी हा उत्तम पर्याय आहे.

5. चेहऱ्यावरील सुरकुत्या

तुरटीच्या पाण्याने चेहरा धुतल्यास सुरकुत्या कमी होण्यास मदत होते आणि चेहरा उजळतो.

6. अंगदुखी

अंगदुखी होत असल्यास, तुरटीच्या पाण्याने अंघोळ केल्याने वेदना कमी होतात आणि आराम मिळतो.


अंघोळीसाठी तुरटीचं पाणी वापरताना त्याचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे. जास्त प्रमाणात वापरल्यास त्वचेला त्रास होऊ शकतो. त्यामुळे सावधगिरी बाळगावी.

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story