चेहऱ्यावर वारंवार बर्फ लावत असाल तर सावधान! होऊ शकतात त्वचेवर घातक परिणाम

Intern
May 28,2025


उन्हाळ्यात अनेकांना त्वचेशी संबंधित विविध समस्या जाणवतात आणि त्यावर उपाय म्हणून अनेकजण चेहऱ्यावर बर्फ लावून मसाज करतात.


बर्फामुळे काही वेळ थंडावा आणि ताजेपणा मिळत असला, तरी याचा अतिरेक केल्यास त्वचेला नुकसान पोहोचू शकते.


तुम्हाला माहिती आहे का की बर्फ थेट आणि जास्त वेळ चेहऱ्यावर लावल्याने काही गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात?

फ्रॉस्टबाइटची शक्यता

जर तुम्ही बर्फ थेट चेहऱ्यावर लावत असाल. तर त्यामुळे त्वचेवर जळजळ, सुन्नपणा आणि लालसरपणा निर्माण होऊ शकतो. हे लक्षण फ्रॉस्टबाइटचे असू शकते.

कोरडी आणि संवेदनशील त्वचा

ज्या लोकांची त्वचा आधीच कोरडी आणि संवेदनशील आहे, त्यांनी बर्फ वापरणे टाळावे. बर्फ त्वचेतील नैसर्गिक ओलावा शोषून घेतो. ज्यामुळे त्वचा अधिक कोरडी होते.

रक्तवाहिन्यांचे नुकसान

बर्फामुळे त्वचेतील रक्तवाहिन्यांवर ताण येऊ शकतो आणि त्यामुळे चेहऱ्यावर लालसर डाग दिसू लागतात.

छिद्रांमध्ये घाण शिरण्याची शक्यता

जर चेहऱ्यावर मेकअप किंवा धूळ असेल आणि त्यावर बर्फ लावला, तर घाण त्वचेच्या छिद्रांमध्ये जाऊ शकते, ज्यामुळे ब्रेकआउट्स आणि मुरुम होण्याची शक्यता वाढते.

योग्य पद्धत काय?

बर्फ थेट चेहऱ्यावर लागू न देता, तो स्वच्छ सूती कापडात गुंडाळून वापरावा.


बर्फाने मसाज करताना 1-2 मिनिटांपेक्षा जास्त वेळ टाळावा. बर्फ लावण्याआधी चेहरा पूर्णपणे स्वच्छ असावा.


दररोज बर्फ लावणे टाळावे. आठवड्यातून 2 ते 3 वेळाच पुरेसे आहे.

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story