ग्रीन टी पिण्यासंबंधी लोकांमध्ये बरेच गैरसमज आहेत. त्यामुळे नेमकं ग्रीन टी पिण्याचे फायदे काय आहेत? आणि नुकसान काय? हे समजून घ्या.
ग्रीन टी पिण्यासंबंधी सर्वात मोठा गैरसमज म्हणजे, वजन कमी होतं. हे खरं आहे की, ग्रीन टी चरबी कमी करण्यात मदत करतं. पण तुम्हाला व्यायाम आणि आपल्या डाएटवरही लक्ष द्यावं लागतं.
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी ग्रीन टी प्यायल्यास बराच फायदा होतो असा अनेकांचा गैरसमज आहे. खरं तर सकाळी रिकाम्या पोटी कोणत्याच प्रकारचा चहा पिणं आरोग्यासाठी चांगलं नाही.
रात्री ग्रीन टी प्यायल्यास चांगली झोप लागते असाही गैरसमज आहे. याउलट ग्रीन टीमध्ये कॅफीन असतं, जे रात्री तुमचं झोप खराब करु शकतं.
ग्रीन टी जितकी जुनी असेल तितका जास्त शरिराला फायदा होतो असाही अनेकांचा गैरसमज आहे. पण सहा महिन्यापेक्षा जास्त जुनी ग्रीन टी असल्यास त्यातील अँटीऑक्सिडेंट पॉवर कमी होते.
अॅसिडिटी असल्यास ग्रीन टी प्यायल्याने काही नुकसान होत नाही असं अनेकांना वाटतं. जर तुम्हीही असाच विचार करत असाल तर मग चुकीची माहिती आहे.
गर्भवती असताना ग्रीन टीचं जास्त सेवन करणं योग्य नाही. यामधील कॅफिन आणि टेनिन तुमच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव टाकू शकतात.
अनेकांना ब्लॅक टीच्या तुलनेत ग्रीन टी जास्त फायद्याची आहे असं वाटतं. पण दोन्हींमध्ये फार अंतर नाही.