निरोगी शरीराचं हेच रहस्य

एक लाडू देईल दिवसभराची ताकद; निरोगी शरीराचं हेच रहस्य, पाहा रेसिपी

सुक्यामेव्याचा लाडू

हा आहे सुक्यामेव्याचा लाडू. अकरोड, मनुका, काजू, पिस्ता, बदाम अशा तंतुमय घटकांनी आणि नैसर्गिक स्निग्ध घटकांनी हा लाडू तयार केला जातो.

पोषक तत्वांचा पुरवठा

शरीराला पोषक तत्वांचा पुरवठा करण्यासोबतच हा लाडू तुम्हाला पुरेशी उर्जाही देतो. शिवाय शरीरातील अशुद्ध घटकांचा नाश करतो.

साहित्य

हा लाडू बनवण्यासाठी 1 वाटी बी काढलेला खजूर, अर्धा कप बदाम, मनुका, अकरोड, अंजीर (आवडीनुसार सुका मेवा) घ्या, 1 वाटी तूप, अर्धा चमचा वेलची पूड अशा साहित्याची गरज भासते.

हवाबंद डब्यात हे लाडू ठेवा

सर्व सामग्री एकत्रित करून त्याचं मिश्रण मिक्सरवर बारीक करून घ्या त्यात गरजेनुसार तूप आणि वेलचीपूड टाकून मिश्रणाचे लाडू वळा. एका हवाबंद डब्यात हे लाडू ठेवा.

उर्जेचा पुरवठा

सुक्यामेव्याचे हे लाडू खाल्ल्यामुळं तुमच्या शरीराला उर्जेचा पुरवठा होतो. शिवाय हाडांना बळकटीही येते.

रोगप्रतिकारक घटक

सुक्यामेव्यामध्ये रोगप्रतिकारक घटक असल्यामुळं शरीरातील पेशींचं आरोग्यही सुधारतं.

हा लाडू खाणं फायद्याचं

रक्ताच्या शुद्धीकरण्यासाठीसुद्धा हे लाडू अत्यंत फायद्याचे ठरतात. दिवसभरात मधल्या वेळेत भूक लागल्यावर उगाचच काहीही खाण्यापेक्षा हा लाडू खाणं केव्हाही फायद्याचं.

करताय ना हा लाडू?

मग, तुम्ही कधी बनवताय हा लाडू?

VIEW ALL

Read Next Story