उन्हाळ्यात चेहऱ्याला कोरफडीचा गर लावण्याचे फायदे

Intern
Mar 19,2025


कोरफडीचा गर विविध प्रकारे वापरले जाते. लोक कोरफड खाण्यापासून ते त्वचेवर आणि केसांवर लावण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी वापरतात.


कोरफडीचा गरामध्ये असलेले जीवनसत्त्वे, अमिनो अॅसिड आणि मिनरल्स त्वचा, केसांसाठी फायदेशीर असतात.


उन्हाळ्यात कोरफडीचा कसा वापर करावा, हे जाणून घेऊया:


उन्हाळ्यात सनबर्नची समस्या उद्भवते, त्यामुळे सूर्याच्या कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी बाहेर पडताना त्वचेवर कोरफडीचा गर लावणे उपयुक्त ठरते.


रात्री झोपण्यापूर्वी कोरफडीचा गराने चेहऱ्यावर मसाज केल्याने चेहरा खोलवर स्वच्छ होतो आणि उजळतो.


चेहऱ्यावरील तेल आणि घामामुळे मुरुमांची समस्या उद्भवू लागते. कोरफडीच्या गरामध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म मुरुमे कमी करण्यास मदत करतात.


दररोज कोरफडीचा गर लावल्याने टॅनिंग कमी होते आणि चेहऱ्यावरील डागही कमी होतात. कोरफडीचा गर त्वचेचा रंग एकसमान राखते.


उन्हाळ्यात चेहऱ्यावर कोरफडीचा गर लावल्याने त्वचा हायड्रेट राहते.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story