उन्हाळ्यात अनेकांना काकडी खायला खूप आवडते. काकडीचे शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे असतात.
काही लोक काकडीच्या रसाचेही सेवन करतात. मात्र, या रसाचे कोणकोणते फायदे होतात हे जाणून घेऊयात.
उन्हाळ्यात रोज रिकाम्या पोटी काकडीचा रस प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवण्यासाठी रोज रिकाम्या पोटी काकडीचा रस प्यावा.
वाढते वजन नियंत्रणात आणण्यासाठीही काकडीचा रस फायदेशीर ठरतो.
काकडीचा रस त्वचेला चमकदार बनवण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
शरीरामधील अशुद्धता काढून टाकण्यासाठी या रसाचे दररोज सेवन करावे.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)