पावसाळा आणि वाफाळलेला चहा यांच एक वेगळच नात आहे. त्यातही पावसाळ्यातील चहा आल्याशिवाय अपूर्ण आहे.
आल्याचा चहा पिणे आरोग्यासाठीही फायदेशीर मानल जात. आल्याचा चहामध्ये अनेक पोषक घटक असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
आल्यामध्ये लोह, अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी यासारखे पोषक घटक असतात.
आल्याचा चहा रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. आल्यामध्ये असलेले पोषक घटक रोगांशी लढण्याची शक्ती देते. त्याचबरोबर संसर्गजन्य रोग बरे करण्यास मदत करते.
पावाळ्यात पाण्याचे सेवन कमी होते. हायड्रेटेड राहण्यासाठीचा चवदार मार्ग म्हणजे चहा.
आल्याचा चहामध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे अँटिऑक्सिडंट्स ताणतमाव कमी करण्यासाठी मदत करतात.
पावसाळ्यात बदलत्या हवामानामुळे सर्दी आणि खोकला होणे सामान्य आहे. अशा परिस्थितीत आल्याचा चहा आराम मिळवून देऊ शकतो.
आल्याचा चहा शरीरात उष्णता निर्माण करतो ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.