उन्हाळ्यात वातावरण बदलल्यामुळे आहारात बदल करणे आवश्यक असते.
उन्हाळ्यात शरीर थंड ठेवणाऱ्या पदार्थांच्या आहारात समावेश करावा.
प्रत्येक घरात भाजी किंवा इतर कोणत्याही ग्रेवीमध्ये कांद्याचा वापर केला जातो. याशिवाय, कच्चा कांदा सॅलेड म्हणूनही खातात.
कांदा एक थंड पदार्थ आहे, त्यामुळे उन्हाळ्यात कांदा खाल्ला पाहिजे. तसेच, कांद्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
उन्हाळ्यात कच्चा कांदा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि गॅस किंवा अॅसिडीटीच्या समस्याही टाळता येतात.
कांद्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे कच्चा कांदा शरीराला हायड्रेट ठेवतो.
उन्हाळ्यात उष्णतेची लाट येते तेव्हा उलट्या, मळमळ आणि पोट खराब होण्याच्या समस्या अनेकांना त्रास देतात. अशावेळी कच्चा कांदा खाणे फायदेशीर ठरते.
कांदा केसांसाठी देखील फायदेशीर आहे. कांद्याचा रस केसांना लावल्यास केस मजबूत होतात.
कांदा डोळ्यांना निरोगी ठेवतो आणि रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रित करण्यात मदत करतो.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)