चविष्ट आणि आरोग्यदायी सुकामेवा म्हणून मनुक्यांकडे पाहिलं जातं. या इवल्याशा मनुक्यामध्ये अनेक लाभदायी गुण असतात, ज्याचा शरीराला मोठा फायदा होतो.
महिनाभर मनुके सातत्यानं खाल्ल्यास त्यामुळं शरीरालाही बराच फायदा मिळतो. त्यामुळं दर दिवशी न चुकता मनुके खाण्याचा सल्ला दिला जातो.
मनुक्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फोरस, आयर्न असे घटक असतात. रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेले मनुके खाणं अधिक फायद्याचं ठरतं.
शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी मनुका खाण्याचा सल्ला दिला जातो. महिनाभर मनुका खाल्ल्यानं त्यातील तंतुमय घटक पचनशक्ती सुधारण्यास मदत करतात.
सातत्यानं मनुके खाल्ल्यास हाडांना बळकटी येते. रक्तदाबाच्या समस्या असणाऱ्यांनाही मनुके खाण्याचा सल्ला दिला जातो.
मनुक्याच्या सेवनानं दृष्टीदोषही सुधारतो असं म्हणतात. (वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, आहारविषयक बदलांपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )