रात्री दुधात 'हा' पदार्थ मिसळताच होतील दुप्पट फायदे; सकाळी प्या आणि बदल पाहा
तुम्हाला माहितीये का, रात्रीच्या वेळी दुधात एक पदार्थ मिसळल्यास सकाळी त्याच दुधातील पोषक तत्त्वं दुपटीनं वाढलेली असतात. हा पदार्थ कोणता ठाऊक आहे?
हा पदार्थ आहे खजूर. एकिकडे दुधातील कॅल्शिअम आणि दुसरीकडे खजुरामध्ये असणारं फायबर, पोटॅशिअम, झिंक, विटामिन बी 6, ए आणि के, लोह शरीराला फायदेशीर ठरतं.
दुधात खजूर मिसळून खाल्ल्यास हाडांना बळकटी येते आणि मेटाबॉलिझमही वाढतं. याशिवाय शरीराला दिवसभराची उर्जा मिळते.
खजुरांमध्ये असणारे खनिज घटक हाडं बळकट करतात, त्यांचं आरोग्य वाढवतात. यामुळं ऑस्टियोपोरोसिससारख्या आजारांपासून दूर राहणं शक्य होतं.
खजुरामध्ये सेलेनियम, मँगनीज, मॅग्नीशियम आणि तांब्याचे घटक असतात. ज्यामुळं हाडांची वाढ सुरळीत होते. त्यात हे खजूर दुधात मिसळल्यास त्यातील पोषक घटकांचं प्रमाण दुपटीनं वाढतं.
थोडक्यात शरीराला चांगल्या सवयी लावण्याच्या प्रयत्नांत तुम्हीही असाल तर हा पर्याय फायद्याचा ठरू शकतो. (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भावर आधारित असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)