आपल्या निरोगी आरोग्यासाठी ड्राय फ्रुट्स पौष्टिक आणि उपयुक्त असतात. मनुका हे भारतातील एक अतिशय लोकप्रिय ड्राय फ्रूट म्हणून ओळखलं जातं. जे भारतात वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरले जाते. पण तुम्हाला माहित आहे का, मनुका एखाद्या औषधी वनस्पतीपेक्षा कमी नाही. मनुक्यामध्ये प्रोटीन्स, फायबर, आयर्न, पोटॅशियम, कॉपर, मॅंगनीज इत्यादी पोषक घटकांचा समावेश आहे.
मनुक्यामध्ये अनेक जीवनसत्त्वे, कॅल्शियम आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे शरीराला अनेक प्रकारे फायदे होतात.
अनेक जण मनुके जसेच्या तसे खातात, तर काहींना भिजवलेले मनुके खायला आवडतात. मनुका खाण्याच्या पद्धतीचा ही तुमच्या आरोग्यावरही चांगला परिणाम होऊ शकतो.
भिजवलेल्या मनुकांचे रिकाम्या पोटी सेवन केल्याने वाढलेले वजन कमी करण्यासाठी मदत होते.
भिजवलेले मनुके बद्धकोष्ठता दूर करतात आणि पचन सुधारतात. याशिवाय हे खाल्ल्याने तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरताही दूर होते.
भिजवलेले मनुके हाडांचे आरोग्य सुधारतात. त्यात बोरॉन आणि कॅल्शियमसारखे आवश्यक पोषक घटक असतात.
मनुकामध्ये व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट पोषक घटकांचा समावेश असतो. ज्यामुळे डोळ्यांच्या जाणवणाऱ्या समस्या, मोतीबिंदू अशा समस्यापासून आपला बचाव केला जातो.
हाय ब्लड प्रेशरच्या समस्या जाणवत असतील तर, सकाळी रिकाम्या पोटी मनुके खाऊ शकता. त्यामुळे तुमचे हृदय निरोगी राहण्यासाठी मदत होते.
अनेकांना केस गळतीची समस्या असते. जर तुम्हाला या त्रासापासून सुटका हवी असेल तर सकाळी मुनक्याचे पाणी पिऊ शकता. त्यामुळे केसगळतीची समस्या दूर होण्यास मदत होते आणि केसांची वाढ होते.