पुरुषांसाठी ‘हे’ आहे शिलाजीत पेक्षा वरदान!
धावपळीच्या जगात लोकांना अनेकदा थकवा जाणवतो. यासाठी ते विविध पद्धती अवलंबतात.
हा थकवा घालवण्यासाठी शिलाजीतपेक्षा शक्तीशाली अशा स्पायरूलिनाबद्दल जाणून घेणार आहोत.
याबद्दल खूप कमी लोकांना माहिती असून थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी हे अतिशय प्रभावी आहे.
ही हिरवी दिसणारी गोष्ट बहुतेक तलावांमध्ये आढळते. लोक ते शतकानुशतकं वापरत आहेत.
गरीब लोकांसाठी हे सहज उपलब्ध असून खूप कमी खर्च होतो.
निळ्या – हिरव्या शैवाल आणि क्लोरेला प्रमाणे पाण्यात वाढणारी स्पिरुलिना आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.
याचं सेवन केल्याने शरीराला 18 पेक्षा जास्त जीवनसत्त्वे आणि मुबलक प्रथिने मिळतात. स्पायरुलिना हृदयाशी संबंधित समस्या, रक्तदाब आणि साखर नियंत्रित ठेवते.
याच्या सेवनामुळे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शक्तीमध्ये वाढ होते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)