आजकाल प्रत्येकाला केस गळतीच्या समस्येला सामोरे जावे लागते.बिझी लाईफ स्टाईलमुळे केसांची निगा राखली जात नाही.
तर केस गळती थांबविण्यासाठी आपण घरगुती उपयोग जाणून घेणार आहोत.
सर्वांच्या घरी तांदळापासून तयार केलेले पदार्थ बनवले जातात. याच तांदळाचा उपयोग तुमच्या केसांवरही होऊ शकतो.
तांदळाच्या पाण्यामुळे केसांची ताकद, पोत आणि वाढ सुधारू शकते.
कोरड्या आणि निर्जीव केसांसाठी तांदळाचे पाणी उपयुक्त ठरते.
तांदळाचे पाणी केसांसाठी खूप फायदेशीर आहे. जर तुमचे केस कोरडे व निर्जीव असतील तर तांदळाचे पाणी वापरा.
आपल्या केसांमध्ये नैसर्गिक कंडिशनप्रमाणे काम करेल. यात भरपूर पोषक घटक असतात जे केसांच्या वाढीस मदत करतात.
केस मऊ बनविण्यात देखील तांदळाचे पाणी फायदेशीर ठरते.
तांदळाच्या पाण्यामध्ये इनोसिटॉलचे गुणधर्म आढळतात.ज्यामुळे तुमचे केस मजबुत होण्यास मदत होते.