गवतावर अनवाणी चालण्याचे 'इतके' फायदे; वाचून थक्कच व्हाल
सहसा चालायला गेलं असता एखाद्या उद्यानातही काही मंडळी शूज किंवा चप्पल पायात ठेवूनच चालतात.
प्रत्यक्षात ते चुकतायत. कारण, गवतावर अनवाणी चालल्यानं तुम्हाला बराच फायदा होतो.
गवतावर अनवाणी चालल्यामुळं झोप उत्तम होते. तणावही कमी होतो.
गवतावर अनवाणी चालल्यानं दृष्टीसंदर्भातील समस्या भेडसावत नाहीत. याशिवाय हृदयाचं आरोग्यही उत्तम राहतं.
गवतात अनवाणी चालल्यामुळं सततच्या विचारानं थकलेला मेंदू शांत होतो आणि गुड हार्मोनमध्ये वाढ होते.
दर दिवशी किमान अर्धा तास गवतावर अनवाणी चालल्यानं, शरीरात हे सकारात्मक बदल जाणवू लागतात. (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारलेली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)