ग्रीन टी, लव्हेंडर टी नंतर आता ऑरेंज टीचा ट्रेंड

Feb 06,2024


लोकं आरोग्याच्या बाबतीत जागरूक झाले असुन त्यांनी आहारात बदल केले आहेत. या आहारातही अनेक व्हरायटी आल्या आहेत.


आल्याचा चहा, लव्हेंडर टी, ग्रीन टीचे तुम्ही ट्राय केलाचं असेल तर आता ऑरेंज टीमुळे शरीराला काय फायदे होतात जाणुन घेऊयात.


सध्या ऑरेंज टीची चव सर्वांना आवडत आहे यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात.


ऑरेंज टी हा चवदार आणि आरोग्यदायी असतो आणि हिवाळ्यात जास्त प्यायला जातो. दुधाच्या चहाऐवजी संत्र्याच्या सालीचा चहा प्यायल्या शरीराला पोषक तत्वांचा लाभ होतो.


ऑरेंज टीमध्ये व्हिटामिन सी सार्ख शरीराला आवशक असलेलं गुणधर्म आहेत. संत्र्याच्या सालीमध्येही अनेक प्रकारचे पोषक घटक असतात, जे प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.


संत्र्याच्या सालीमध्ये लिमोनिन असते. हे विशेषतः संत्र्याच्या सालामध्येच आढळते. यात कर्करोग आणि दाहक विरोधी गुणधर्म आहेत. रोज संत्र्याच्या सालाचे सेवन केल्यास जळजळ आणि त्वचेच्या कर्करोगाचा धोका टाळता येतो.


दररोज सकाळी हा चहा प्यायल्याने पचनसंस्था मजबूत होते. त्यामध्ये उपस्थित व्हिटामिन सी हा घटक चयापचय आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतो.


संत्र्याच्या सालीमध्ये पॉलिफेनोल्स भरपूर प्रमाणात असतात जे टाईप-2 मधुमेह, लठ्ठपणा आणि अल्झायमर सारख्या आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतात.

VIEW ALL

Read Next Story