बेसन खाण्याचे फायदे आणि तोटे तुम्हाला माहितीये का?
बेसनचा अनेक पदार्थ घरोघरी केले जातात. बेसन खाण्याचे शरीराला अनेक आरोग्यादायी फायदे होतात.
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या संशोधनातून त्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या.
भाजलेल्या बेसनामध्ये सोडियम कमी असतं, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. ते हृदयासाठी फायदेशीर आहे.
बेसनामुळे पोट भरल्यासारखे वाटतं, जे जास्त खाण्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. हे वजन कमी करण्यास मदत करते.
बेसनामध्ये असलेले विरघळणारे फायबर आणि असंतृप्त चरबी कोलेस्टेरॉल कमी करण्यास प्रभावी आहेत.
बेसन हे लोहाचा एक चांगला स्त्रोत आहे. जे अशक्तपणासारख्या समस्यांमध्ये आराम देऊ शकते. हे लाल रक्तपेशींच्या निर्मितीस मदत करते.
बेसनामध्ये आढळणारे कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम हाडे मजबूत करण्यास मदत करतात. ऑस्टिओपोरोसिस प्रतिबंधित करते.
बेसन हे फायबरचा चांगला स्त्रोत आहे, जे पचन सुधारते. यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येतही आराम मिळतो.
बेसनाचे जास्त सेवन केल्याने पोटफुगी आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. मर्यादित प्रमाणात सेवन करा.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)