पावसाळ्यात खराब हवामानामुळे अनेकजण आजारी पडतात. जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर, तुम्हाला अनेक आजारांचा सामना करावा लागतो.
असं म्हणतात की, त्या त्या सिझनमध्ये येणारी फळं खाल्ल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते. जाणून घेऊयात पावसात कोणत्या फळांचं सेवन करावं ?
पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी डाळिंब मदत करतं. डाळिंबात व्हिटॅमीन बी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे रक्तातील पेशींची वाढ होण्यास मदत होते.
जांभळामध्ये लोह आणि पोटॅशिअम मात्रा मुबलक असते. त्यामुळे पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास जांभळाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.
द्राक्ष पोटॅशिअम, कॉपर, व्हिटामीन के आणि सीयुक्त असल्याने शरीरासाठी फायदेशीर ठरतं. पावसाळ्यात पोटाच्या अनेक तक्रारी जाणवतात. म्हणूनच द्राक्षाच्या सेवन आतड्यांसाठी आरोग्यदायी ठरतं.
सफरचंदामध्ये मोठ्या प्रमााणात फायबरची मात्रा असते. जर सतत अशक्तपणा जाणवत असल्यास सफरचंदाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.
पावसाळ्यात मका आवर्जून खाल्ला जातो. मक्यामध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्याचबरोबर मक्याची भाकरी आणि पराठा खाल्याने पित्ताचा त्रास कमी होतो. (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)