चवीने भरलेली वांगी अनेकांना आवडतात. मात्र, काही लोकांसाठी वांगी त्रासदायक ठरू शकतात.
भरली वांगी, वांग्याचे भरीत, वाग्यांची भाजी हे अनेकांचे आवडते मेन्यू आहेत.
आरोग्याविषयीच्या विशिष्ट तक्रारी असणाऱ्यांनी वांगी खावू नयेत.
खाज, खरूज, नायटा यासारख्या त्वचाविकाराचा त्रास होत असेल तर वांग खाणं टाळा.
पित्तांचा त्रास असलेल्यांनी वांगी खाऊ नयेत. वांग खाल्ल्यामुळे आम्लपित्ताचा त्रास होतो.
दमा आणि अस्थमा सारखे आजार असणाऱ्यांनो वांग्याची भाजी खाणे टाळावे.
किडनी स्टोन म्हणजे मुतखड्याचा त्रास असेल तर वांगी खावूच नये.