आजकालच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे किंवा इतर काही कारणांमुळे चेहऱ्यावरील त्वचा खूप निस्तेज होऊ लागते.
खसखस ही फक्त आरोग्यासाठीच नाही, तर चेहऱ्याच्या त्वचेसाठीही खूप फायदेशीर मानली जाते.
खसखस चेहऱ्याला चमक वाढवण्यासाठी आणि त्वचेला उजळण्यासाठी काम करते.
खसखसच्या मदतीने त्वचा चमकू लागते आणि त्यावरील डागही कमी होऊ लागतात.
दह्यामध्ये खसखस मिसळून चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज केल्याने त्वचा चमकू लागते आणि डाग नाहीसे होतात.
जर तुम्हाला कोरड्या त्वचेची समस्या असेल, तर खसखसमध्ये मध घालून चेहऱ्याला दररोज मसाज करावा. त्यामुळे त्वचा मऊ होते.
खसखस 30 मिनिटे दुधात भिजवून त्याची पेस्ट बनवून चेहऱ्याला लावावी. यामुळे त्वचेवरील पुरळाची समस्या दूर होते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)