मोबाईलवर येणारे नोटिफिकेशन तुम्हाला आजारी पाडू शकतात?

Intern
Mar 03,2025


मोबाईल आजकाल आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.


मोबाईल आपल्या अनेक गरजा पूर्ण करत असला तरी, याच्या काही सवयी तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम करू शकतात.


मोबाईलमधून येणारे नोटिफिकेशन्स हृदय आणि मेंदूवर परिणाम करू शकतात.


सकाळी उठल्यावर फोनमधील चुकीच्या नोटिफिकेशन्स पाहिल्याने ताण वाढतो आणि रक्तदाबही वाढू शकतो.


आपण सकाळी ज्या गोष्टी पाहतो, त्या गोष्टी दिवसभर आपल्या मनात घोळत राहतात.


सकाळी आलेली एक नोटिफिकेशन तुमचा संपूर्ण दिवस खराब करू शकते.


रात्री उशिरा फोन वापरणे आणि सकाळी उठल्याबरोबर फोनकडे पाहणे, यामुळे मानसिक नैराश्य देखील होऊ शकते.


ऑफिसमध्ये कॉम्प्युटर आणि लॅपटॉपसमोर बसून उर्वरित वेळ फोनमध्ये घालवणे, हे देखील आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.


सतत स्क्रीनकडे पाहणे हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story