एक ठराविक काळ उपाशी राहिल्यानंतर लगेचच भूक लागण्यास सुरुवात होते. शरीराला उर्जेची कमतरता जाणवताच भुकेवाटे ते काहीतरी खाणं सुचवू पाहत असतं.
भूक लागणं हे जरी सामान्य असलं तरीही वारंवार काहीतरी खावंसं वाटणं मात्र आरोग्यविषयक इशाराच असून अनेकदा हे मधुमेहाचं प्राथमिक लक्षण ठरतं.
थायरॉईड हार्मोनचं असंतुलन होणं हेसुद्धा अती भूक लागण्यामागचं कारण ठरु शकतं.
झोप कमी असणं किंवा निद्रानाशाचाही भुकेवर परिणाम होतो. कमी झोपेमुळं शरीरात घ्रेलिन हार्मोन वाढून भूक वाढते.
अनेकदा मानसिक तणावामुळंही जास्त भूक लागते.
काही प्रसंगी प्रोटीन आणि फायबरची कमतरता शरीराला अपेक्षित उर्जेचा पुरवठा करत नाही, ज्यामुळं वारंवार भूक लागते.
अनेकदा काही व्याधींवरील औषधं सुरू असल्यासही त्याचा परिणाम थेट भुकेवर होतो. त्यामुळं भूक अती प्रमाणात लागत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नका. (वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)