10- 15 रुपयांना मिळतो निरोगी आयुष्याचा ठेवा; 'या' पालेभाजीचे कैक फायदे

Published by: Sayali Patil | Jan 24, 2025

चंदनबटवा

चंदनबटवा ही एक अशी पालेभाजी आहे, जिच्या सेवनामुळं शरीरात अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतात. दैनंदिन आहारातही या भाजीचा समावेश केल्यास अनेक फायदे दिसून येतात.

Published by: Sayali Patil | Jan 24, 2025

चयापचय क्रिया

चयापचय क्रिया सुरळीत चालू ठेवण्यासाठी चंदनबटव्याच्या भाजीचं सेवन केल्याचा सल्ला दिला जातो.

Published by: Sayali Patil | Jan 24, 2025

विटामिन

चंदनबटव्यामध्ये विटामिन ए, सी, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, फायबर आणि प्रोटीन हे घटक असतात.

Published by: Sayali Patil | Jan 24, 2025

तंतुमय घटक

या पालेभाजीमध्ये मोठ्या प्रमाणात तंतुमय घटक असल्यानं वजन नियंत्रण ठेवण्यासही मदत होते. चंदनबटव्याच्या सेवनामुळं शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते.

Published by: Sayali Patil | Jan 24, 2025

प्रोटीन

चंदनबटव्यामध्ये प्रोटीन आणि विटामिन असल्यामुळे केसांनाही या भाजीच्या सेवनाचा फायदा मिळतो. शिवाय केसगळतीची समस्याही कमी होते.

Published by: Sayali Patil | Jan 24, 2025

रक्तातील साखरेचं प्रमाण

मधुमेहींसाठी या भाजीचं सेवन अतिशय फायद्याचं ठरतं. यामुळं रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. (वरील माहिती सामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)

Published by: Sayali Patil | Jan 24, 2025

VIEW ALL

Read Next Story