लवंग तुपात भाजून खाल्ल्याने होतात अनेक फायदे
भारतीय स्वयंपाकघरात लवंग आणि तूप हे कायम असतं.
लवंग आणि तूपाचे सेवनातून अनेक आरोग्याचे फायदे होतात.
जर तुम्ही लवंग ही तुपात भाजून खाल्ल्यास तुम्हाला अनेक फायदे मिळतात.
यासाठी पॅन गरम करा आणि त्यात एक चमचा तूप घाला. आता तुपात लवंग घालून ती चांगली भाजून घ्या.
तुम्हाला उलट्या होत असेल तर तुपात भाजलेली लवंग उपयुक्त ठरते.
श्वसनाच्या विकाराचा त्रास असल्यास ही लवंग फायदेशीर ठरते.
पोट फुगणे आणि पोटदुखीसाठीही तुपातील लवंग मदतगार ठरते.
जुनाट खोकला आणि सर्दी झाल्यास तुपातील लवंग खा.
एलर्जिक राइनाइटिस बाबतीत, तुपात भाजलेली लवंग फायदेशीर ठरते.
त्यासोबत तुपात भाजलेली लवंग ही डोळ्यांसाठीही उपयुक्त आहे.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)