नारळाचे पाणी केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर

नारळ पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात हे आपल्याला माहितीच आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का ते केसांना देखील लावता येते?

नारळाच्या पाण्यात पोटॅशियम, कॅल्शियम,मॅगनीज, अँटीऑक्सीडंट, साइटोकिनिन असे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात.यामुळे शरीर,त्वचा आणि केसांसाठी अनेक फायदे होऊ शकतात.

केस हायड्रेटेड राहतात

नारळाचे पाणी केसांना हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. त्याचबरोबर केस मऊ आणि चमकदार दिसतात.

केस गळती

जर तुम्हाला केस गळण्याची समस्या असेल तर नारळाचे पाणी फायदेशीर ठरते. त्याचबरोबर केस तुटणे कमी होते.

कोंडा दूर करतात

नारळाच्या पाण्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सीडंट गुणधर्म असतात जे केसांना कोंडा होण्यापासून वाचवतात.

केस मजबूत होतात

नारळ्याच्या पाण्याचे सेवन केल्याने शरीरात रक्ताभिसरण वाढते,ज्यामुळे केसांमध्ये ऑक्सिजन वाढते. यामुळे केस मजबूत होतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story