उत्तम आणि सुदृढ शरीरयष्टीसाठी निरोगी शरीर बरीच मदत करतं आणि इथं महत्त्वाची भूमिका बजावतात आहाराच्या सवयी.
शारीरिक सुदृढता कायम ठेवण्यासाठी आहारात कायमच फळांचा समावेश करण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ आणि डॉक्टर देतात.
आरोग्यासाठी कायमच फायदेशीर ठरणाऱ्या या फळांमध्ये हृदयविकार आणि श्वसनविकार असणाऱ्यांना फायदेशीर ठरणारं फळ म्हणजे सिताफळ.
आंब्याप्रमाणंच सहसा बाजारांमध्ये मोठ्या पेट्यांमधून येणाऱ्या सिताफळात असणारे मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हे घटक हृदयाचं आरोग्य जपण्यास मदत करतात.
सिताफळामध्ये पोटॅशियमची असणारी पुरेशी मात्रा अशक्तपणा दूर करण्यास मदत करते.
व्हिटामिन C आणि व्हिटामिन A अशी पोषक तत्त्वं असल्यानं सिताफळाचं सेवन डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि दम्याची समस्या असणाऱ्यांसाठीसुद्धा फायद्याचं ठरतं.