डोळ्यांखालील डार्क सर्कल होतील झटक्यात गायब; ट्राय करा 8 सोपे उपाय

Intern
Mar 26,2025


सध्या अनेकांना डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांची समस्या उद्भवू लागली आहे.


दिवसभर ऑफिसमध्ये काम केल्यामुळे किंवा झोप पूर्ण न झाल्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येऊ लागतात.


डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी हे काही घरगुती उपाय आहेत.

1. बटाट्याचा रस

कच्च्या बटाट्याचा रस डोळ्यांखाली लावल्याने काळी वर्तुळे कमी होऊ शकतात.

2. काकडीचे तुकडे

काकडीचे तुकडे डोळ्यांवर ठेवल्याने रक्तभिसरण सुधारते. त्यामुळे काळे डाग कमी होण्यास मदत होते.

3. टी-बॅग

टी-बॅगला पाण्यात बुडवून फ्रिजमध्ये ठेवावे. थंड झाल्यानंतर टी-बॅग डोळ्यांवर ठेवली की काळी वर्तुळे कमी होतात.

4. कोरफडीचा गर

कोरफडीच्या गराने डोळ्यांभोवती हलक्या हाताने मसाज केल्याने काळी वर्तुळे कमी होतात.

5. टोमॅटोचा रस

टोमॅटोच्या रसाने डोळ्यांच्या आसपास मसाज केल्याने काळसर भाग कमी होऊ शकतात.

6. गुलाबपाणी

गुलाबपाणी कापसावर घेऊन डोळ्यांवर ठेवल्याने काळे डाग कमी होण्यास मदत होते.

7. कच्चे दूध

कच्चे दूध एक नैसर्गिक क्लिंझर आहे. डोळ्यांखाली कच्चे दूध लावल्याने वर्तुळे कमी होऊ लागतात.

8. नारळाचे तेल

नारळाच्या तेलाने डोळ्यांखाली हलक्या हाताने मसाज केल्याने काळी वर्तुळे कमी होतात.


या साध्या उपायांनी तुम्ही डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करू शकता आणि त्वचेची चमक वाढवू शकता.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story