चविष्ट हराभरा कबाब: हेल्दी आणि टेस्टी रेसिपी

Intern
Mar 18,2025


हराभरा कबाब आरोग्यासाठी फायदेशीर असून चवदारही असतात. तर जाणून घेऊयात याची सोपी रेसिपी.

साहित्य:

पालक, 1 कप उकडलेला हिरवा मटार, 2 उकडलेले बटाटे, किसलेलं आलं, हळद, गरम मसाला, आमचूर पावडर, भाजलेले बेसन, तेल, मीठ आणि ब्रेडचा चूरा


1. सर्वप्रथम पालक आणि उकडलेले बटाटे बारीक कापून घ्या.


2. एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करा. त्यात उकडलेला मटार आणि पालक घालून मटार सुके होईपर्यंत शिजवा.


3. मटार आणि पालक शिजल्यानंतर ते एका भांड्यात घ्या आणि त्यात उकडलेले बटाटे घालून चांगले मॅश करा.


4. आता त्यात बेसन, मीठ, गरम मसाला, आमचूर पावडर, हळद आणि ब्रेडचा चूरा घालून सर्व घटक एकत्र करा.


5. या मिश्रणापासून कबाबच्या आकाराच्या टिक्की तयार करा आणि पॅनवर खरपूस भाजून घ्या.


6. जर तुम्हाला कबाब तळायचे असतील तर तेलात फ्राय करा. गरमागरम हराभरा कबाब तयार आहेत.

VIEW ALL

Read Next Story