जगाला विळखा घातलेल्या कोरोनावर सिरम इन्स्टिट्यूटने प्रभावी लस तयार केली होती.
यानंतर आता लवकरच सिरम इंस्टिट्यूट अजून एक लस तयार करण्यावर काम करतेय.
सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक सायरस पूनावाला यांनी ही माहिती दिलीये.
पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये डेंग्यूवर परिणामकारक ठरेल अशा लसीची आणि औषधाची निर्मिती सुरू आहे.
पुढच्या वर्षभरात ही औषधं येऊ शकतील, अशी माहिती पूनावाला यांनी दिली आहे.
त्यामुळे डेंग्यूविरोधातली लस पुढच्या वर्षभरात येण्याची शक्यता आहे.