फळं ही शाकाहारीच असतात असं म्हणत या फळांचं सेवन काही मंडळी दर दिवशी करतात. बरेचजण तर उपवासाच्या दिवशीसुद्धा फलाहारच करतात.
पण तुम्हाला माहितीये का, एक फळ असंही आहे जे एका विशिष्ठ प्रक्रियेतून तयार होत असल्यामुळं ते मांसाहारी श्रेणीत गणलं जातं.
हे फळ म्हणजे अंजीर. अंजीर तयार करण्यात गांधीलमाशीची महत्त्वाची भूमिका असते.
गांधीलमाशी अंडी देण्यासाठी अंजीर फळात प्रवेश करते आणि नकळत त्या अंजीर फळातील पराग सोबत नेते.
गांधीलमाशी फळात फिरल्यानंतर आधीच्या फळातील पराग एका नव्या अंजीरामध्ये जाऊन तिथं वाढ धरतात आणि पॉलिनेशन प्रक्रिया होते.
अंजीरात प्रवेश करणारी माशीची अंडी कधीच बाहेर येऊ शकत नाहीत आणि तिथंच मृतावस्थेत राहतात.
या मृतावस्थेतील अंड्यांवर अंजीर फळातील एंन्झाईम आणि हे फळ अवशोषित करतं. या संपूर्ण प्रक्रियेमुळं अंजीर हे फळ मांसाहारी म्हटलं जातं.