अनेकांच्या घरातील खिडकी किंवा बाल्कनीमध्ये कबूतरं येत असतात. कबूतर हे संसर्गजन्य आजाराला कारणीभूत असल्याचं आपण अनेकदा ऐकलं असेल.
खरंच, कबूतर माणसांमध्ये आजार पसरवण्याला कारणीभूत असतात का? आणि असतील तर ते कसं? याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
कबूतर माणसांमध्ये फंगल इंफेक्शन, बॅक्टेरियल इंफेक्शन आणि व्हायरल इंफेक्शन अशा प्रकारच्या संसर्गजन्य समस्यांना आमंत्रण देत असतात.
हे सगळे आजार कबुतरांच्या विष्ठेतून उद्भवत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या आजारांना कबुतरांची विष्ठा कारणीभूत असते.
खरंतर, कबुतरांच्या विष्ठेमध्ये 'हिस्टोप्लाज्मोसिस' (Histoplasmosis) आणि 'साल्मोनेला' (Salmonella) हे बॅक्टेरिया असतात.
कबूतर तुमच्या बालकनीमध्ये किंवा खिडकीमध्ये येऊन बीट (विष्ठा) करतात. ही विष्ठा वाळल्यानंतर त्यातील बॅक्टेरिया श्वासाद्वारे माणसांच्या शरीरात जातात.
यासोबतच कबूतर 'एन्सेफलायटीस' (Encephalitis) सारखे संसर्ग पसरवतात. या संसर्गामुळे मानवी मेंदूत सूज निर्माण होऊ शकते.
उल्टी होणे, सर्दी, खोकला, सतत शिंका येणे आणि अस्थमा ही या संसर्गाची काही मुख्य लक्षणे आहेत.
याव्यतिरिक्त, कबूतरांच्या पंखांमुळेदेखील 'कबूतर ब्रीडर रोग' ही एलर्जी उद्भवू शकते.
यावर उपाय म्हणून बालकनीचा भाग नेटने कव्हर करुन घेऊ शकता. बालकनी किंवा खिडक्यांमध्ये कबूतरची विष्ठा दिसल्यास ती लगेच स्वच्छ करा.
इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.