पहिल्यांदाच योगा करताय ?तर 'या' सोप्या आसनांनी करा सुरूवात.

Jun 18,2024


दरवर्षी 21जूनला आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला जातो. जर तुम्ही पहिल्यांदाच योगासन करणार असाल तर 'ही' सोपी आसने नक्की करा.

उत्तनासन

हे आसन करणे अगदी सोपे आहे. या आसनामुळे मेंदूला रक्त पुरवठा होण्यास मदत होते. हे योगासन करताना दोन्ही पायांमध्ये समान अंतर ठेवून शरीर खालील बाजूस झुकवावे. यामुळे रक्त आणि ऑक्सिजन मेंदूपर्यंत पोहचायला मदत मिळते.

अधोमुख शवासन

हे आसन केल्याने रक्ताभिसरण वाढते. हे आसन केसांचा वाढीसाठी सर्वोत्तम मानले जाते. हे आसन करताना शरीर झुकवून दोन्ही हात डोक्याच्या वरच्या बाजूला ठेवावे.

भुजंगासन

भुजंगासनामुळे पाठीचा कणा बळकट होतो आणि झोपेच्या समस्या दूर होतात. भुजंगासनामध्ये पोट जमिनीला टेकवणे त्यामुळे प्रथम जमिनीवर पालथे झोपा. हनुवटी छातीला टेकवा आणि कपाळ जमिनीला टेकवा. हाताचे पंजे छातीजवळ आणा आणि फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे हातांच्या पंज्यावर शरीराचा भार देऊन बेंबीपासूनचा भाग हळू हळू वर उचला.

प्राणायाम

वजन कमी करण्यासाठी प्राणायम मदत करते. श्वसनक्रिया उत्तम करण्यासाठी याचा उपयोग होतो. हे आसन करताना दोन्ही हात समोर गुढघ्यावर ठेवा. कंबर सरळ ठेवा आणि डोळे बंद ठेवा. आता दीर्घ श्वास घ्या आणि तोंड बंद ठेवून, नाकाने श्वास सोडा.

वृक्षासन

हे आसन अगदी सोपे आहे. हे आसन करताना ताठ उभे रहावे, एक पाय दुसरा पायावर ठेवून दोन्ही हात वरच्या दिशेला ताणावेत. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story