तुम्ही पहिल्यांदा योगा करताय, ही घ्या काळजी?

योगसाधना प्राचीन पद्धत

Yoga Day 2023 : योगसाधना ही भारतातील अशीच एक प्राचीन पद्धत आहे, जी शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढवते. पूर्वीच्या काळी लोक पाण्यावर, दगडांवर, लाकडावर किंवा खडकांवर बसून योगासने करत असत, पण आधुनिक काळात ही जागा चटईंनी घेतली आहे. तुम्ही पहिल्यांदा योगा करत असाल तर काळजी घेतली पाहिजे?

या गोष्टींची काळजी घ्या

मोकळ्या आणि ताज्या हवेत योगासने करणे फायदेशीर आहे. परंतु जर हे शक्य नसेल तर रिकाम्या जागेत आसने करण्याचा प्रयत्न करा.

अशी घ्या काळजी

योगा करताना कमकुवत गुडघे, कंबर, पाठीचा कणा आणि मान अशा नाजूक अवयवांची विशेष काळजी घ्या. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या किंवा वेदना होत असतील तर हळू हळू आसनातून बाहेर या.

सैल कपडे घालावेत

योगासने करताना नेहमी सैल आणि आरामदायी कपडे घालावेत. तुम्ही सैल टी-शर्ट किंवा ट्रॅक पँट घालूनही योगा करु शकता.

जोर किंवा ताण देऊ नका

जोर देऊन कोणतेही योगासन करु नका किंवा ताण देऊन योगाच्या आसनातून बाहेर पडू नका. याशिवाय सहज शक्य तितके योगासने करा.

या गोष्टींचा वापर टाळा

योगा करताना दागिने, गळ्यातील चेन, घड्याळ, बांगड्या इत्यादी काढून ठेवा. कारण योगा करताना तुम्हाला त्रास होऊ शकतो.

चटईचा वार करा

योगासने सुरू करणाऱ्यांसाठी मॅट अर्थात चटई आवश्यक आहे. योग परंपरा सांगते की पूर्वीचे योगी गवत किंवा प्राण्यांच्या कातडीपासून हाताने बनवलेल्या चटयाही वापरत असत. योग करण्यासाठी तुम्ही सिंथेटिक किंवा हाताने विणलेल्या मॅट्स वापरु शकता.

शरीराला आधार मिळतो

चटई कुशन म्हणून काम करते. जी योगासने करताना शरीराला आधार देते. जमिनीवर योगासने करताना लोकांना तळवे, गुडघे, कोपर आणि पाठीचा कणा दाबल्यावर वेदना आणि अस्वस्थता जाणवते, पण जर तुम्ही चटईवर बसले असाल तर तुम्हाला या सर्व त्रासांना सामोरे जावे लागत नाही.

ही आसने करताना...

काही आसने थेट जमिनीवर केली जात नाहीत. कारण यामुळे मनगटावर जास्त ताण येतो. त्याच बरोबर ताडासन आणि वृक्षासन, दादो मुख स्वानासन आणि कुंभकासन यांसारखी आसने करण्यासाठी चटई देखील आवश्यक आहेत.

VIEW ALL

Read Next Story