अक्रोडात कॅलरी जास्त असले तरी त्यामध्ये पोषक तत्वेही जास्त असतात.
अक्रोड खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. जर कोणी नियमितपणे अक्रोड खात असेल तर त्याच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते.
जर तुम्हाला रात्री चांगली झोप येत नसेल तर तुम्ही अक्रोड खाऊ शकता. यामुळे तुमची झोप सुधारू शकते.
नियमितपणे अक्रोड खाल्ल्यास वजन नियंत्रणात राहते.
जे लोक दररोज अक्रोड खातात त्यांची प्रतिकारशक्ती मजबूत असते. तुमची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर तुम्ही अक्रोड खाणे सुरू करू शकता.
अक्रोड खाल्ल्याने उन्हाळ्यात सूज कमी होते आणि यामध्ये आढळणारे पॉलिफेनॉल जळजळ कमी करते.
अक्रोडमध्ये अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात तसेच सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून शरीराचे रक्षण करते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)