दारू पिणं आरोग्यासाठी धोकादायक असतं. मात्र, दारूचीही एक्स्पायरी डेट असते, हे अनेकांना माहीत नसते.
व्हिस्की, जिन, वोडका, रम यांसारखी दारू अनेक वर्षे टिकते.
यामध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त असते, जे त्यांना खराब होण्यापासून प्रतिबंधित करतं. ब्रँडी देखील बराच काळ टिकते.
वाइनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण कमी असते, म्हणून ते डिस्टिल्ड मद्यापेक्षा जास्त लवकर खराब होते.
बिअरमध्ये अल्कोहोलचे प्रमाणही कमी असते आणि त्यात अनेक नैसर्गिक घटक असतात, ज्यामुळे ती लवकर खराब होते.
वाइनची चव, सुगंध आणि रंग यावरून वाइन खराब झाली आहे की नाही हे ठरवता येतं.