धकाधकीच्या जीवनामध्ये प्रजनन क्षमतेवरही परिणाम करणाऱ्या अनेक घटकांचा सामना सध्याची पिढी करत आहे.
ही एक अशी समस्या आहे, जी महिला आणि पुरुषांमध्ये आढळते.
आरोग्यदायी शुक्राणूंच्या निर्मितीमध्ये व्यक्तीचं शरीर सक्षम नसल्यामुळं प्रजनन क्षमता प्रभावित होते.
प्रजनन क्षमतेवर परिणाम करणारे अनेक घटक असले तरीही ताणतणाव हे यातील महत्त्वाचं कारण आहे.
अतितणावामुळं पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो.
स्ट्रेस टेस्टेस्टोरॉन आणि ल्यूटिनायझिंग हार्मोन यांसारखे महत्त्वाचे हार्मोन तणावामुळं कमी होतात.
महिलांमध्ये तणावामुळं अनियमित मासिक पाळी, ओव्युलेशनमध्ये अडचणी अशा समस्या उद्भवतात. (वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही. आरोग्यविषयक समस्यांसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. )