दही लवकर आंबट होते? मग या टिप्स वापरा, साखरेची गरज भासणार नाही

Intern
Feb 26,2025


वातावरणातील बदलांमुळे दही लवकर खराब होऊ शकते.


अशा परिस्थितीत या काही टिप्स वापरा ज्यामुळे दही लवकर आंबट होणार नाही आणि जास्त काळ ताजे राहील


जर तुम्ही दही घरी बनवत असाल, तर ते नेहमी योग्य वेळेत गोठवा. यामुळे दही बराच काळ ताजे राहील.


रात्री दही व्यवस्थित ठेवा आणि सकाळी ते नीट गोठल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे दही लवकर खराब होणार नाही.


दही ताजे ठेवण्यासाठी नेहमी मातीच्या भांड्यात दही लावावे. यामुळे दही आणि पाणी वेगळे होत नाहीत.


दही खराब होण्यापासून वाचवण्यासाठी ते रूम टेम्परेचरपेक्षा थोड्या थंड ठिकाणी ठेवा. यामुळे दही अधिक काळ ताजे राहते.


दही लावताना नेहमी हे लक्षात ठेवा की, दही लावणाऱ्या भांड्याच्या आजूबाजूला कोणतीही फळं किंवा भाजी असू नये.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story