उन्हाळा सुरू होताच त्वचेवर त्याचा परिणाम दिसू लागतो. तीव्र सूर्यप्रकाशामुळे चेहरा अनेकदा लालसर होतो आणि त्यासोबतच जळजळही जाणवते.
जर तुमचाही चेहरा उन्हामुळे लालसर होत असेल, तरहे घरगुती उपाय नक्कीच उपयुक्त ठरू शकतात.
गुलाब पाणी चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवरील उष्णतेची तीव्रता कमी होते आणि जळजळ दूर होते. हे पाणी त्वचेला शांतता देते.
त्वचेवरील खाज, रॅशेस किंवा अॅलर्जी कमी करण्यासाठी मध खूप फायदेशीर आहे. यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे त्वचेला आराम देतात.
चेहऱ्यावरील सूज आणि लालसरपणा कमी करण्यासाठी बर्फ वापरणे प्रभावी उपाय आहे. स्वच्छ कपड्यात बर्फ गुंडाळून सौम्यपणे चेहऱ्यावर फिरवावा.
त्वचेवरील लालसरपणा, कोरडेपणा आणि अॅलर्जीवर खोबऱ्याचे तेल उपयुक्त आहे. यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात.
कोरफडीचा गर चेहऱ्यावरील जळजळ, खाज आणि लालसरपणा कमी करण्यात मदत करतो. यामध्ये थंडावा देणारे आणि उपचार करणारे गुणधर्म आहेत.
या घरगुती उपायांचा वापर करण्यापूर्वी त्वचेची लहानशी चाचणी घेणे आवश्यक आहे. जर त्रास वाढत असेल तर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.