गाढवाचं दूध हे नैसर्गिक मॉइश्चरायझरचं काम करतं. यामुळे त्वचा चमकते.
जगभरातील सौंदर्य प्रसाधनांमध्ये गाढवाचं दूध वापरलं जातं. अगदी आयुर्वेदामध्येही त्वचेच्या रोगांवर गुणकारी म्हणून गाढवाच्या दूधाचा वापर करावा असं लिहिलेलं आहे.
गाढवाच्या दुधामुळे अनेक आजारांपासून संरक्षण होतं असंही सांगितलं जातं. यामध्ये डोकेदुखीचाही समावेश आहे. तसेच ऑस्टियोपोरोसिसवरही हे दूध फारच प्रभावी ठरतं.
एका संशोधनानुसार या दुधाचं सेवन केल्याने आतड्यांना होणाऱ्या विषाणूंच्या संसर्गाची शक्यता कमी होते.
या गाढवाचं दूध 7000 ते 8000 रुपये लिटर दराने विकलं जातं.
हलारी प्रजातीचं गाढवं ही रंगाने पांढरी असतात. सामान्य गाढवांप्रमाणे त्यांचा रंग करडा नसतो.
ही मागणी इतकी आहे की सौराष्ट्रमध्ये गाढवाचं दूध विकण्यासाठी चक्क वेगळी डेअरी लवकरच सुरु होणार आहे.
गुजरातमधील हलारी प्रजातीच्या गाढवाच्या दूधाला फार मागणी आहे.