चुकूनही पपईसोबत 'या' 5 गोष्टी खाऊ नका! अन्यथा...

Oct 28,2023


पपई खाल्ल्यानंतर वजन कमी होतं आणि पचन क्रिया सुधारते. पण या आरोग्यदायी फळासोबत चुकूनही काही गोष्टींचं सेवन करु नका.

डाळिंब

पपईमध्ये असलेल्या पपेनमुळे डाळिंबाच्या बिया पचण्यास शरीराला कठीण जातं. यामुळे पोटदुखी, मळमळ आणि उलट्या यांसारख्या त्रास तुम्हाला होऊ शकतो.

मसालेदार अन्न

पपईमध्ये असलेले पपेन मसालेदार अन्नाचा प्रभाव वाढतो. त्यामुळे पोटात जळजळ, दुखण्यासारखी समस्या निर्माण होते.

चिकन आणि मासे

पपईमध्ये असलेले पपेन देखील चिकन आणि माशांमधील प्रथिने नष्ट करतात. यामुळे पोटदुखी, मळमळ आणि उलट्या यांसारख्या समस्या तुम्हाला होऊ शकते. तेवढंच नाही तर अन्न विषबाधा होण्याचा धोका वाढतो.

कच्चे अंडे

पपईमध्ये असलेले पपेन कच्च्या अंड्यातील प्रथिने देखील नष्ट करतात. यामुळे पोटदुखी, मळमळ आणि उलट्याचा त्रास होतो.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ

जर तुम्ही पपईसोबत दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ खाल्ले तर पपईने दुधात असलेली प्रथिने खराब होण्याची भीती असते. यामुळे पोटदुखी, मळमळ आणि उलट्या यांसारख्या समस्या निर्माण होते. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story