कोमट पाणी आरोग्यासाठी आणि पोटासाठी खूप फायदेशीर असते.
कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिसळून प्यायल्याने पोटात साचलेली घाण साफ होण्यास मदत करते.
पोटाशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी दररोज कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिसळून प्यावे.
वजन कमी करण्यासाठी याचे सेवन करावे.
हे शरीराला डिटॉक्सिफाई करण्यात देखील मदत करते.
मध आणि लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
लक्षात घ्या की, लिंबूमधील अॅसिडमुळे दातात झिणझिण्या किंवा छातीत जळजळ यासारख्या समस्यादेखील होऊ शकतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)