कडक उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी प्या 'हे' 5 हेल्दी ड्रिंक्स

Intern
Mar 28,2025


उन्हाळा चांगलाच वाढला आहे आणि यामुळे अनेकांना ऊन सहन करणे कठीण होऊ लागले आहे.


जर तुम्हालाही उन्हाळ्यात त्रास होत असेल, तर तुम्ही हे हेल्दी ड्रिंक्सचे सेवन करू शकता.

1. पुदिना ड्रिंक

उन्हाळ्यात पुदिन्याच्या पाण्याचे सेवन केल्याने शरीराला थंडावा मिळतो. तसेच पुदिना अन्न पचनासही मदत करतो.

2. कैरीचं पन्ह

कैरीचं पन्ह उन्हाळ्यात अनेकांच्या घरात आवडीनं तयार केले जाते. हे पन्ह पोटाला थंड ठेवते आणि शरीराच्या उष्णतेला कमी करते.

3. चिया लेमन ड्रिंक

चिया आणि लिंबू यांचे मिश्रण असलेले चिया लेमन ड्रिंक चविष्ट आणि आरोग्यदायी आहे. हे ड्रिंक शरीराला तसेच त्वचेला हायड्रेट ठेवते.

4. बेल फळाचा रस

बेल फळ म्हणजेच वूड अ‍ॅप्पलचा रस शरीराला थंड ठेवतो आणि पचनशक्ती सुधारतो. यामुळे शरीरात उष्णता कमी होण्यास मदत होते.

5. नारळ पाणी

रोज नारळ पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि त्वचा देखील चांगली होऊ लागते. नारळ पाणी शरीराला उष्णतेपासून बचाव करतं.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story