'हे' 7 पेय तुम्हाला आजारी पडू देणार नाहीत, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दररोज प्या

Jul 17,2024

हळदीचे दूध हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन तत्व हे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास ओळखले जाते. तसेच दूधमध्ये प्रथिने आणि कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे. एक ग्लास दुधात चिमूटभर हळद आणि थोडा मध मिसळून प्यावे.

काळी मिरी ताक

ताक हे प्रोबायोटिक्सने समृद्ध आहे जे आतड्याच्या आरोग्यास समर्थन देते आणि आतडे मजबूत करते.

आवळ्याचे रस

आवळा हा व्हिटॅमिन सी चा खजिना आहे. जो रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे रोज एक चमचा आवळ्याचा रस थोडया पाण्यात मिसळून ते पातळ करून प्यावे.

संत्र आणि गाजराचे रस

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते आणि गाजरमध्ये व्हिटॅमिन ए असते, हे दोन्ही घटक रोग प्रतिकारशक्तीसाठी फायदेशीर असते.

पालक आणि पुदिन्याचा रस

पालक हा लोह आणि फोलेटचा चांगला स्रोत आहे, तर पुदिना पचनक्रिया निरोगी ठेवते. या दोन्हींचे मिश्रण करून रस बनवणे आरोग्यास खुप फायदेशीर आहे.

दालचिनी आणि ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात. दालचिनीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात.

आले, तुळस आणि मधाचा चहा

आले सर्दीशी लढण्यास मदत करते, तुळस रोग प्रतिकारशक्ती वाढवते आणि मध घसा शांत करते. या तिघांचे मिश्रण करून चहा प्यावे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story