इवलंसं पान पाण्यात उकळून प्या; होईल कमाल फायदा

प्राचीन काळापासूनच तुळस ही एक पवित्र वनस्पती म्हणून ओळखली जाते. तुळशीचे औषधी गुणधर्मदेखील अनेक आहेत.

जसे की रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापासून ते श्वसनाच्या समस्या सोडवण्यापर्यंतच्या अनेक आजारांवर तुळस रामबाण उपाय आहे. पावसाळ्यात तुळशीचे काढ्याचे सेवन करणे अमृतासमानच आहे.

आहारतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार तुळशीची पाने पाण्यात १० ते १५ मिनिटे भिजवून मंद आचेवर पाणी उकळून त्याचे सेवन केल्यास शरीराला स्वच्छ करण्यास मदत होते.

मुबलक प्रमाणात असलेल्या अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्वे आणि इतर फायदेशीर पोषक तत्वांमुळे तुळशीचे पाणी आरोग्याच्या विविध समस्यांवर रामबाण उपाय ठरते.

तुळशीला अॅडप्टोडजेन मानले जाते कारण तुळस शरीराला ताणतणावाशी जुळवून आणि संतुलन राखण्यास घेण्यास मदत करते.

त्याचप्रकारे ज्यांची जीवनशैली तणावग्रस्त आहे त्यांनी दिवसातून एकदा तरी तुळशीचे पाणी प्यायलास फायदा होतो. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story