रोज तुपाचे पाणी प्यायल्यास होतात 'हे' जबरदस्त फायदे

Intern
May 02,2025

घी वॉटरचे फायदे:

तुपाला आयुर्वेदात एक सुपरफूड मानले जाते. याचे आरोग्यविषयक अनेक फायदे आहेत. योग्य प्रमाणात देसी गाईचे तूप घेतल्यास ते शरीरासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.

1. ऊर्जा आणि मेटाबॉलिझम वाढवते:

तुपामध्ये शॉर्ट चेन आणि मिडियम चेन फॅटी अ‍ॅसिड असतात. जे त्वरीत ऊर्जा देतात आणि मेटाबॉलिझम वाढवतात.

2. पचनक्रिया सुधारते:

सकाळी रिकाम्या पोटी एका ग्लास गरम पाण्यात तूप मिसळून प्यायल्याने पचन सुधारते आणि पोट हलके वाटते.

3. गॅस आणि बद्धकोष्ठतेवर उपाय:

तुपामध्ये असलेले ब्युटिरिक अॅसिड पचनसंस्थेस मदत करते. त्यामुळे गॅस, पोटफुगी आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते.

4. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते:

दररोज तुपाचे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

5. डिटॉक्स प्रक्रिया सुधारते:

हे पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते आणि पचनसंस्था स्वच्छ ठेवते.

6. सांध्यांची लवचिकता वाढवते:

गरम पाण्यात तूप मिसळून घेतल्याने सांधे लवचिक राहतात आणि वेदना कमी होण्यास मदत होते.

7. त्वचेसाठी फायदेशीर:

तुपाचे पाणी त्वचेला नैसर्गिक चमक देते, कोरडेपणा कमी करते आणि त्वचा निरोगी ठेवते.

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story