घरच्या घरी मशरुम उगवण्याची सोपी पद्धत

Intern
Mar 20,2025


घरच्या घरी सोप्या पद्धतीने तुम्ही मशरुम उगवू शकता. मशरुम उगवण्यासाठी जास्त जागेची आवश्यकताही नसते.

साहित्य:

मशरुमच्या बिया, लाकडाची टोपली, पेंढा, स्प्रेची बाटली, पाणी

मशरुम कसे उगवावे?

पेंढ्याला पाण्यात 15 तास भिजवून ठेवा, नंतर त्याला निर्जंतूक करण्यासाठी 30 मिनिटे पाण्यात उकळून घ्या.


त्यानंतर लाकडाच्या टोपलीत तो पेंढा ठेवा. 2 ते 3 इंचांच्या थरानंतर त्यावर मशरुमच्या बिया घाला आणि हलका दाब देऊन कपड्याने झाकून ठेवा.


मशरुमच्या वाढीसाठी 20-25 डिग्री तापमान आणि 70-80% ओलसरपणा आवश्यक आहे.


दिवसातून 2 ते 3 वेळा स्प्रे बाटलीने पाणी घाला, मात्र पेंढा जास्त ओला होणार नाही याची काळजी घ्या.


जेव्हा मायसेलियम वाढू लागतो, तेव्हा त्याला मंद प्रकाश आणि ताज्या हवेत ठेवा.


20 ते 25 दिवसांनी छोटे-छोटे मशरुम उगवायला लागतात.


जेव्हा मशरुम पूर्णपणे उघडतात, तेव्हा हलक्या हाताने त्यांना खेचून काढा. याच पेंढ्यावर 3 ते 4 वेळा मशरुम उगवतात.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story