महिनाभर सकाळी मूठभर भाजलेले चणे खाल्ल्याने मिळतील 'हे' फायदे

भाजलेले चणे केवळ स्वादिष्टच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतात.

पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या चण्यांमध्ये प्रथिने, फायबर, लोह, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी सारखे स्रोत आढळतात.

सकाळी मूठभर भाजलेले चणे खाल्ल्याने आरोग्य सुधारण्यास मदत होते.

रोगप्रतिकारशक्ती

भाजलेल्या चण्यांमध्ये अँटिऑक्सिडेंट असते जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास आणि आजारांपासून वाचवण्यास मदत करते.

पचन सुधारते

भाजलेल्या चण्यांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते, जे पचन सुधारण्यास मदत करते. त्यामुळे बद्धकोष्ठता आणि पोट फुगणे यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

वजन कमी करते

भाजलेले चणे खाल्ल्याने जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे वजन कमी करण्यास मदत

मधुमेह नियंत्रण

भाजलेल्या चण्यांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

हृदय आरोग्य

भाजलेल्या चण्यांमध्ये असलेले फायबर आणि मॅग्नेशियम हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते. हे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.

ऊर्जेची पातळी

भाजलेले चणे कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिनांचा एक चांगला स्रोत आहे, जे ऊर्जा प्रदान करते. त्यामुळे थकवा आणि अशक्तपणा दूर होण्यास मदत होते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story