हिवाळ्यात आजारांना आळा घालण्यासाठी 'या' चटणीचं करा सेवन

Dec 27,2024


यूरिक अॅसिड वाढल्याने बरेचसे आजार उद्भवण्याची शक्यता असते. शरीरातील यूरिक अॅसिडचे अधिक प्रमाण बऱ्याच अडचणींना कारणीभूत ठरते.


हिवाळ्यात लसणाची चटणी खाल्ल्याने यूरिक अॅसिडला नियंत्रित ठेवण्यास मदत होते. लसूण हा उष्णता वाढवणारा पदार्थ असून हिवाळ्यात त्याची चटणी खाणे फायद्याचे ठरते.


लसणात अँटी बॅक्टेरीयल, अँटी इंफ्लेमेटरी आणि अँटी फंगलसारखे अनेक गुणधर्म असतात जे आपला व्हायरल आजारापासून बचाव करतात.


लसणाची चटणी आपली इम्यूनिटी मजबूत करण्यासाठी खूपच फायदेशीर ठरते. त्याचे सेवन केल्याने शरीर निरोगी ठेवण्यास मदत होते.


थायरॉईडशी संबंधित आजाराने ग्रासलेल्या लोकांनी लसणाची चटणी खाल्ली पाहिजे जेणेकरुन थायरॉईडसारख्या आजारांना आळा घालण्यास मदत होते.


नेहमी लसणाची चटणी खाल्ल्याने पचनसंस्थेशी निगडीत आजार दूर होतात.


लसणाची चटणी कॉलेस्ट्रोलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरते.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story