रोज रात्री न चुकता खा 'हे' ड्रायफूट; सकाळी एका झटक्यात पोट होईल साफ, मूळव्याध तर विसरुन जाल

Shivraj Yadav
Oct 24,2024

बदललेली लाईफस्टाईल आणि खाणं यामुळे अनेकांना पोटाच्या समस्या जाणवू लागल्या आहेत.

बद्धकोष्ठता आणि गॅस होणं या यातीलच एक आहेत. यापासून सुटका कशी करुन घ्यायची हे जाणून घ्या.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मनुक्याचं सेवन बद्धकोष्ठतेवर मात करण्यात मदत करु शकतं.

या ड्राय फ्रूटमध्ये नैसर्गिक साखर, फायबर, विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात, ज्यामुळे ते आरोग्यासाठी फायदेशीर असतं.

जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर रोज रात्री 5 ते 6 मनुक्यांचं सेवन करणं लाभदायक आहे.

यासाठी तुम्हाला रोज सकाळी 5 ते 6 मनुके पाण्यात भिजत ठेवावे लागतील. यानंतर ते रात्री झोपण्याआधी खा.

मनुका खाल्ल्यानंतर तुम्ही त्याचं पाणी पिऊ शकता. यामुळे तुम्हाला गॅससारख्या समस्यांपासून सुटका मिळेल.

रात्री मनुका खाल्ल्याने सकाळी तुमचं पोट साफ होईल.

यासह तुम्हाला आणखी एक फायदा होईल. मूळव्याध असणाऱ्यांना शौचादरम्यान कोणत्याही वेदना होणार नाहीत.

VIEW ALL

Read Next Story