कोलेजन हा एक प्रकारचा प्रथिनं आहे. जो आपली त्वचा, केस आणि हाडांसाठी खूप महत्त्वाचा असतो.
याची शरीरात कमतरता झाल्यास चेहऱ्यावर सुरकुत्या आणि रेषा दिसू लागतात. कोलेजन कमी झाल्याने केसही गळू लागतात.
शरीरातील कोलेजन अनेक कारणांमुळे कमी होऊ शकते, जसे की अस्वस्थ जीवनशैली, चुकीचा आहार आणि वाढते वय. म्हणूनच कोलेजन वाढवणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करणे खूप महत्त्वाचे आहे.
कोलेजन वाढवण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे सप्लिमेंट्स उपलब्ध आहेत. पण विशेष म्हणजे नैसर्गिक गोष्टींनी देखील कोलेजन वाढवता येते. हे एक फळ खाल्ल्याने शरीरातील कोलेजन नैसर्गिकरित्या वाढते.
लिची हे एक असे फळ आहे ज्याच्या मदतीने कोलेजन वाढवता येते. लिचीमध्ये व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असते.
हे फळ खाल्ल्याने शरीरातील कोलेजन वाढू लागते. यामुळे त्वचा सैल राहत नाही आणि तरुण दिसू लागते.
लिचीमध्ये असलेले पॉलीफेनॉल, फ्लाव्होनॉइड्स आणि बीटा-कॅरोटीन मुक्त रॅडिकल्सशी लढतात. त्यामुळे त्वचेला आतून संरक्षण मिळते आणि कोलेजनची कमतरता भासत नाही.
लिची केवळ कोलेजन वाढवण्यास मदत करत नाही, तर त्वचेला हायड्रेट ठेवण्यास देखील मदत करते. त्यात सुमारे 80% पाणी असते. जे त्वचेला आतून हायड्रेटेड आणि ताजे ठेवते.
सकाळी रिकाम्या पोटी 5-6 ताज्या लिची खावी किंवा लिची-स्ट्रॉबेरी स्मूदी बनवून प्यावी.
दही किंवा ओट्समध्ये लिची मिक्स करुन खाल्ल्याने देखील अनेक फायदे होतात. याशिवाय तुम्ही लिंबू आणि पुदिन्यापासून लिची डिटॉक्स वॉटर तयार करून पिऊ शकता.